Blogs

आता !
युद्ध ‘मारा’ विरुद्ध आहे,
प्रश्न स्वार्थाचा नाही, नाही, जनकल्याणाचा,
अपेक्षा ‘अनहद’ अवस्था मिळविण्याची आहे.
मार वार करतोय,
असत्याच्या अंधारात, ढकलू पाहतोय,
विचारांच्या प्रगल्भतेला खुटवतोय,‘बोन्साय ‘ सारखं.
डाव टाकतोय,अस्थिर वर्तनामातून,
अस्पष्ट भविष्याच्या स्वप्नांचा.
या स्थितीत,
असत्याच्या तिमिरातू मार्ग शोधतोय,
ज्ञानाच्या प्रकाशाचा.
आणि म्हणून
मी, ‘सांख्ययोगाने’, कर्तव्याची ओळख केली,
रजो, तमो, व्याधीला, सत्व चा काढा देऊन,
मी ‘ब्रम्ह’ झालो.
मी कर्माची फलोपेक्षा नाही ठेवली,
पण, शरणागती, ही अध्यात्मिक गुलामगिरी ठरते,
म्हणून त्याला पाठ फिरवली.
आता मी,
कण झालोय मातीचा, गोरा कुंभाराच्या अंगणातील,
नैतिक आचरणाच्या चिखलात तुडवून घेतोय अनैतिकता,
मी,
तुका झालोय,
नाठाळाणा काठी मारून,
तोंड वाजवतोय, निशंख.मी,
‘अबीर’ गुलालात न्हाऊन, ‘पांडुरंगाचे’ नाव घेत,
चोखोबाची पायरी ओलांडलीय,
आणि कडकडून भेटलो विठ्ठलाला,
मी,
कबीराचा घाट उतरलो,
स्वार्थाची मटकी फोडून ’ राम ‘ झालो
आणि यातच भेटला मला,
' गोलपिठातल्या ' नामा,
ज्याने शिकवले मला,जीवाच नाव बदलून, जगायला.
उपकाराच्या मशाली विझवून,
स्वयं प्रकाशासाठी झगडायला.
मीही आभाळ मुका घेऊन, ललांभूत झालो.
मला माहित आहे हे एवढ सगळ अपूर्ण आहे,
जे प्राप्त आहे त्या जोरावर,
आता!
मी ही पलटवार करतोय,
धार्मिक आचरण ऐवजी,
अध्यात्मिक, सदाचरणाचा,
अनैतिकतेवर, नैतिक मूल्यांचा,
कारण मी जाणले, इथे.जगणेच सम्यक आहे,
सम्यक आचरणच, संबुद्ध आहे,सम्यक संबुद्ध आहे
.©️एस.सुदर्शन.

Scroll to Top